Deepika Padukone Bikini Special Report : दीपिकाच्या भगव्या रंगातील बिकिनीवरून गदारोळ
abp majha web team | 15 Dec 2022 10:46 PM (IST)
अभिनेता शाहरूख खान आणि दीपिका पदुकोन यांची भूमिका असलेला पठाण सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या भगव्या रंगातील बिकिनीवरून गदारोळ उडालाय. सोशल मीडियावर पठाण सिनेमा बॉयकॉट करण्यासाठी मोहीम सुरू झालीय. या वादात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतलीय. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तमदास मिश्रा यांनी मध्यप्रदेश पठाण सिनेमावर बंदी घालण्यात येईल असा इशारा दिलाय. दीपिकाचा भगव्या रंगातील बिकिनीचा सीन काढून टाकावा अन्यथा मध्य प्रदेशात पठाण सिनेमाचा एकही शो लागू देणार नसल्याचं मिश्रा यांनी म्हटलंय