Mumbai School : मुंबईतल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अधांतरी,नाशिकच्या शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर
abp majha web team | 29 Nov 2021 10:39 PM (IST)

1 डिसेंबरपासून राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागानं नियमावली जाहीर केलीय. तरीही नाशिक शहरातल्या शाळा मात्र तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतल्या शाळांबाबतही संभ्रम असल्याचं महापौरांनी सांगितलंय.
त्यामुळं सरकारनं जरी नियमावली तयार केली असली तरी शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार का? राज्यातल्या इतर शहरांमध्येही वेगळा निर्णय होणार का हे पाहावं लागेल.