Deccan Express : मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी विस्टाडोम कोच,खंडाळा घाटाचं सौंदर्य अनुभवता येणार!
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 27 Jun 2021 01:05 AM (IST)
एलएचबी कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेषची पहिली फेरी आज (26 जून) सुरू झाली. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व 44 सीट्स आज बुक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतली.