Garba Heart Attack Special Report : गरबा खेळताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
abp majha web team | 03 Oct 2022 11:08 PM (IST)

संपूर्ण मुंबईत जल्लोषात नवरात्री उत्सव सुरू आहे.मात्र काल रात्री मुलुंड मध्ये गरबा खेळत असताना हृदय रोगाचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषभ लहरी मंगे भानुशाली असे मयत 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे.तो डोंबिवली चा रहिवासी होता.एमबीएचे शिक्षण घेतले होते.मुलुंड मधील कालिदास नाट्यगृह येथे भाजप तर्फे आयोजित दांडिया मध्ये ही घटना घडली आहे.गरबा खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागले.त्याला मुलुंड च्या आदिती हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.