Kolhapur | कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या मूळ बांधकामाला धोका, मंदिरावर हजारो टनांचं अतिरिक्त वजन
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2020 11:40 PM (IST)

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट पहिल्यांदाच होत आहे. या ऑडिटच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. अंबाबाईच्या मंदिरावर हजारो टनांचा बोजा आहे. वेळोवेळी कोबा टाकल्यानं मंदिराच्या छतावर इतकं वजन झालंय की ते तात्काळ काढणं गरजेचं आहे.