Special Report | रात्री कर्फ्यू पण दिवसा होणाऱ्या गर्दीचं काय? कोरोना रात्रीच फिरतो का? विरोधकांचा सवाल
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2020 11:52 PM (IST)

Night Curfew लागू केल्यानंतर या नियमांचं पालन करण्यास राज्यात सुरुवात झाली. विशेषत: हे नियम लागू करण्यात आल्यांनंतर मुंबईत याचे थेट परिणाम दिसून आले. ज्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमही पाहायला मिळाला. रात्रीच्या वेळी असणारी संचारबंदी म्हणजे घराबाहेर पडायचंच नाही का, असा प्रश्नही अनेकांना पडला. ज्याबाबत आता पोलीस यंत्रणांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.