कार्यकर्ते अजितदादांचं का ऐकत नाहीत? शिवसैनिक मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत? नियम नक्की कुणासाठी?
abp majha web team | 02 Jan 2022 11:48 PM (IST)

राज्यात एकीकडे दररोज कोरोना रुग्णांचे आकडे वाढत चालले आहेत. पण असं असताना दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र बेभानपणे वागताना दिसतायत दिसतायत. अनेक पक्षांकडून कोरोनाच्या नियमांना हरताळ फासल्याचं चित्र वारंवार दिसतंय. त्यामुळे नियम हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का? आणि राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांना या नियमांमध्ये सूट आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.