✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha

abp majha web team  |  09 Sep 2026 11:08 PM (IST)
ABP News

सध्या राज्यात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असली, तरी त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवाची चर्चाही सुरू झालीये... दर वर्षीप्रमाणे यंदाही निमित्त आहे दांडिया आणि गरबा कार्यक्रमांतल्या अन्यधर्मिय तरुणांच्या सहभागाचं... विश्व हिंदू परिषद आणि मंत्री नितेश राणे याबाबत बोलत असताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र त्यांच्या भूमिकांना छेद दिलाय... बघुयात हा वाद नेमका काय आहे या स्पेशल रिपोर्टमध्ये... 


नवरात्रोत्सव जवळ आला की दरवर्षी एका मुद्द्यावरून परस्परविरोधी मतांच्या टिपऱ्या एकमेकींवर आदळू लागलात... 


गरबा-दांडियामध्ये असलेली अन्यधर्मियांची... त्यातही मुस्लीम तरुणांची कथित उपस्थिती... 


यंदा हा मुद्दा प्रामुख्यानं छेडलाय विश्व हिंदू परिषदेनं... 


नवरात्रोत्सव मंडळांसाठी एक निवेदन आणि मार्गदर्शिका विहिंपनं तयार केलीये... 


यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे चांगलेच भडकलेत... 


विश्व हिंदू परिषदेपाठोपाठ नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठेका धरला...

पण त्यांच्या मताला विरोध झाला तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम मिनिस्टरकडून... 

आपले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या परस्परविरोधी मतांमुळे भाजप प्रवक्त्यांची अवस्था नरो वा... कुंजरो वा... अशी झाल्याचं दिसतंय... 


विरोधी पक्षांनी मात्र अमृता फडणवीसांच्या विधानाचा पुरेपूर वापर करून घेत नितेश राणे आणि भाजपभोवती फेर धरलाय... 


तर अभिनेता श्रेयस तळपदे यानंही सर्व सण एकत्रच साजरे करत आलोय, असा सूर लावलाय... 


मुळात दांडिया-गरब्यामध्ये किती मुस्लीम तरूण येतात... 


त्यातले किती कथित 'लव्ह जिहाद'चा हेतू मनात ठेवून हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढतात... 


किती तरुणी दांडिया-गरब्याच्या नऊ दिवसांत फसवल्या जातात... 


याची कोणतीही आकडेवारी एकही नेता किंवा हिंदुत्त्ववादी संघटना देत नाही... 


ठोस पुराव्यांशिवाय केली जाणारी विधानं ही केवळ राजकारणासाठी... 


Beat around the bush... म्हणजे मुख्य मुद्द्यावर न बोलता केवळ झुडपाला बडवत राहणं ठरतं... 


त्याऐवजी दांडिया आणि गरब्यामध्ये होणाऱ्या अन्य गैरप्रकारांवर बोललं आणि आवाज उठवला तर ते अधिक फलदायी ठरेल... 


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.