Connection of Bihar bridge Special Report : बिहार पूल दुर्घटनेचं मुंबईशी कनेक्शन!
abp majha web team
Updated at:
06 Jun 2023 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांच्याही जीविताशी खेळ मांडला जातोय का? असा सवाल आता उभा ठाकलाय. कारण, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलांचं काम एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आलंय. ही तीच कंपनी आहे, जिच्याकडे बिहारमध्ये कोसळलेल्या पुलाचं काम आहे. असा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केलाय. त्याचसोबत, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलांचं काम दुसऱ्या कंपनीकडे देण्यात यावं, असं रवी राजा म्हणालेत. दरम्यान, एस. पी. सिंगला कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी त्यांनी केलीय.