Lockdown Effect : 'सुटसुटीत नियमावली द्या! निर्बंधांमध्ये विसंगती', व्यापाऱ्यांचा संताप
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2021 11:41 PM (IST)
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनानं शिरकाव केल्यापासून पहिल्यांदाच देशात नव्या कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 3 हजार 588 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे.