मुंबईत खासगी वाहनांसाठी उद्यापासून लाल, हिरवा आणि पिवळा कलर कोड, कोणत्या वाहनांसाठी कोणता रंग?
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 17 Apr 2021 10:56 PM (IST)
मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून वाढत्या करोनासंसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून आधी विकेंड लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. परंतु तरीही संचारबंदीच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडून आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या मुंबईकरांवर आता पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्यापासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू होणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती दिली.