Chandrapur Mines Special Report : चंद्रपूरकरांसाठी कोळशाच्या खाणी ठरतायत डोकेदुखी!
abp majha web team | 22 Nov 2022 11:39 AM (IST)
मुंबई-पुण्यासारखी शहरं विजेच्या लखलखाटाने 24 तास चमकतात, मात्र या लखलखाटाची किंमत चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्यातील लोकं कशा प्रकारे चुकवतात याचं एक ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाच्या सर्वाधिक खाणी आहेत, मात्र या खाणींमुळे स्थानिक गावकऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय