Special Report : महाराष्ट्रात पुन:श्च लॉकडाऊन! उद्या मुख्यमंत्र्यांकडून होणार औपचारिक घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2021 11:34 PM (IST)

राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे.