Devendra Fadnavis Agnry on Conratctor : प्रकल्प रखडलेले, मुख्यमंत्री भडकले Special Report
abp majha web team | 04 Nov 2025 10:18 PM (IST)
राज्यातील रखडलेले प्रकल्प आणि कंत्राटदारांच्या थकीत पेमेंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 'सब लोकं ध्यान में रखो, हे पाच पाच सालला जो आप टाइमलाइन देत ना, यहाँ अभी दुनिया में कहीं नहीं होता है,' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. राज्यभरातील कंत्राटदारांचे तब्बल ९० हजार कोटी रुपये सरकारकडे थकीत असल्याचा दावा केला जात आहे. याच मुद्द्यावरून पवई येथे रोहित आर्यचा (Rohit Arya) एन्काउंटर झाला, तर जळगाव जीवन मिशनचे पैसे न मिळाल्याने सांगलीत हर्षल पाटील (Harshal Patil) या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या घटनांमुळे सरकारी कामातील पारदर्शकता आणि पेमेंट प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नागपूरमधील आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी कामे पूर्ण करण्याचा दबाव असताना, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी करण्याची आणि भ्रष्टाचार रोखण्याची गरज व्यक्त केली जात आहे.