CM DCM Naraji : शिंदे-फडणवीस एकाच हॉटेलमध्ये पण दुराव्याची भिंत? Special Report
CM DCM Naraji : शिंदे-फडणवीस एकाच हॉटेलमध्ये पण दुराव्याची भिंत? Special Report
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात दुरावा निर्माण झाल्याची मोठी चर्चा रंगली... त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचाच पुढचा अंक संभाजीनगरमधील प्रचार दौऱ्यात दिसला. संभाजीनगरात प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र दोन्ही नेते एकमेकांना भेटलेदेखील नाही, त्यामुळे विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या... पाहूयात याचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट....
सोमवार...प्रचाराचा शेवटचा दिवस..
पैठणमध्ये भाजपविरूद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत होतेय.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
दोघांनाही पैठणची सभा गाजवायची होती..
दोन्ही नेते रविवारी रात्रीच संभाजीनगरच्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये मुक्कामी होते..
एकनाथ शिंदे पावणे बाराच्या सुमारास हॉटेलमध्ये पोहोचले
तर देवेंद्र फडणवीस सुरूवातीला एका लग्नाला उपस्थित राहिले आणि मग मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये आले
शिंदेंसाठी दुसऱ्या मजल्यावरची २४८ क्रमांकाची रूम बुक होती
तर फडणवीसांचा तिसऱ्या मजल्यावर ३२५ क्रमांकाच्या रूममध्ये मुक्काम होता.
दोघांमध्ये फक्त एका मजल्याचं अंतर..
तरी देखील दोघांची भेट झाली नाही...
आता ही भेट झाली नाही की जाणूबाजून टाळण्यात आली अशा चर्चांना जोरदार उधाण आलंय