Rural School Reopen : ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2021 08:52 PM (IST)

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. राज्यातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहेत. त्यामुळेच लॉकडाऊनच्या अटी देखील हळूहळू शिथील केल्या जात आहेत. त्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा, कॉलेज देखील हळूहळू सुरु होणार आहेत. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र यासाठी ग्रामपंचायतीने शाळेच्या अखत्यारितील पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहेत.