Covid Vaccine घेणं अनिवार्य नाही, लस घ्यायची की नाही हे नागरिक ठरवणार, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2020 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाची लस टोचून घेणं अनिवार्य नाही, लस टोचून घेण्याचा निर्णय प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून आहे, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून भारतात जी लस दिली जाईल, ती प्रगत राष्ट्रांइतकीच परिणामकारक असेल. भारत बायोटेक, झायडस कॅलिडा, जिनोव्हा, ऑक्सफर्ड, स्पुटनिक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड अशा सहा लशी भारतीय संस्थांच्या मदतीनं विकसित होत आहेत. केवळ सुरक्षिततेचे सगळे नियम आणि अटी पूर्ण केल्यानंतरच भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला जाईल असं सरकारनं म्हटलं आहे.