सरकार 'वाघ' व्हा! महिला अत्याचाराच्या घटनांवरून Chitra Wagh यांनी सरकारला धरलं धारेवर
मिकी घई, एबीपी माझा | 05 Sep 2021 10:45 PM (IST)
पुणे : पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवर घटनेविषयी संताप व्यक्त केला. हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे.