Chhatrapati Udayanraje On Rahul Solapurkar :सोलापूरकरांचे वादाचे बोल, राजेंचे खडेबोल Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच..तर सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा, खासदार उदयनराजे भोसलेंचा संताप
अभिनेता राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन खासदार उदयनराजे भोसले चांगलेच कडाडलेत.. सोलापूरकर औरंग्याची औलाद असून त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत अशी घणाघाती टीका उदयनराजे भोसलेंनी केली..
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त बोलल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. पण त्यांच्याविरोधातला संताप कायम आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतला. राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलाद असल्याचा घणाघाती हल्लाबोल उदयनराजेंनी केला. त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला...तसंच त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दुसरीकडे पुण्यात सोलापूरकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं.