Chhatrapati Sambhajinagar News : रद्द प्रमाणपत्र, चौकशीचं सत्र; अधिकाऱ्यांची चूक झाकण्यासाठी नागरिक वेठाला? Special Report

Chhatrapati Sambhajinagar News : रद्द प्रमाणपत्र, चौकशीचं सत्र; अधिकाऱ्यांची चूक झाकण्यासाठी नागरिक वेठाला? Special Report
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं तब्बल ७,२१४ जन्म, मृत्यू प्रमाणपत्रं रद्द करण्याचा निर्णय घेतला. कारण ही प्रमाणपत्रं आवश्यक शासकीय परवानगीशिवाय देण्यात आल्याचे समोर आलं. एवढेच नाही तर देण्यात आलेली प्रमाणपत्र पोलिसांनी शोधून परत आणून द्यावीत असं फर्मान घाटी रुग्णालयानं पोलिसांना दिलं... या सगळ्यात पुन्हा एकदा त्रास होणार आहेत तो मात्र सर्वसामान्य नागरिकांनाच..पाहुयात
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील तब्बल सात हजार जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द
करण्याचा निर्णय घेण्यात आला... गेल्या २३ महिन्यांत, म्हणजे १ नोव्हेंबर २०२३ ते १५
सप्टेंबर २०२५ दरम्यान जारी झालेली ७,२१४ जन्ममृत्यू प्रमाणपत्रं नियमबाह्य ठरल्यानं हा
निर्णय घेण्यात आला...
मृत्यू होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय
दंडाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते.परंतु रुग्णालयातून ही परवानगी न घेता थेट
प्रमाणपत्रं देण्यात आली होती, तीच प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली. या गोंधळात आश्चर्य
म्हणजे रुग्णालयानं पोलीस प्रशासनालाच पत्र पाठवलं,ज्यांना प्रमाणपत्रं देण्यात आली,
त्यांच्याकडून परत गोळा करून रुग्णालयाकडे जमा करायला सांगितलं..