Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
निमित्त होतं राज्यसभेच्या उमेदवारीचं, पण चर्चा रंगली ती छगन भुजबळांची. राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांची मुलंबाळं देशात आणि राज्यात पदं पटकावत असताना आपल्यावरच अन्याय का, असा सवाल करत भुजबळांनी भाजपसमोर एक प्रस्ताव ठेवला. पुतण्या समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद मिळालं, तर राज्यसभेवर जाण्याची तयारी भुजबळांनी दाखवली. पण अखेर राज्यसभेची उमेदवारी मिळाली राजेंद्र जैन यांना. गेल्या २४ तासात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये.
पुतण्याच्या मंत्रिपदाची तजवीज करून राज्यसभेची कबड्डी खेळण्याचा डाव फसल्यानंतर छगन भुजबळांना आता बुद्धीबळाची आठवण येऊ लागलीय.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा होती.
मात्र अखेर प्रफुल्ल पटेल समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र जैन यांच्या नावावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं.
राज्यसभेसाठी डाव मांडल्यापासून शांत असणाऱ्या भुजबळांनी अखेर उमेदवारीच्या सामन्याचा निकाल लागल्यानंतर आपल्या भावनांना वाट करून दिली.
पण या डावात आपण चेकमेट झालो, हे काही भुजबळांना मान्य नाही.
All Shows
































