Chandrapur : माणसाळलेली वाघीण? वीजनिर्मिती केंद्रात वाघिणीचा बिनधास्त वावर : Special Report
सारंग पांडे, एबीपी माझा | 09 Feb 2022 10:01 PM (IST)

चंद्रपूर शहरालगतच्या महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रात पुन्हा वाघिणीचा वावर दिसून आला. रात्री कामावर जात असताना कामगारांना वाघीण दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. कामगार दुचाकीवरून जात असताना ही वाघीण समोर आली. त्यावेळी त्यांनी पळ काढला. दरम्यान यामुळे कामगार आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाकडून आता या परिसरात गस्त घालण्यात येतेय.