Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
आधी चंद्रपूरचे काँग्रेस नेते आपापसात भांडले आणि सत्ता गमावून बसले... आता चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर, काँग्रेसचा ठाकरेंच्या शिवसेनेशी पंगा सुरू झालाय.. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी चक्क काँग्रेसची लाज काढायला सुरूवात केलीय.. चंद्रपुरातल्या सत्तासमीकरणामुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडणार का? चंद्रपूरचा हिशेब चुकता करण्यासाठी काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेला परभणीत सत्तेपासून वंचित ठेवणार का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात
देव देते आणि कर्म नेते...
ही म्हण ऐकली असेलच...
या म्हणीचा अर्थ कुणाला समजवायचा असेल,
तर चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही, सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसचं उदाहरण द्यावं लागेल
ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याच्या जोरावर चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाला..
त्यामुळे काँग्रेसचा तीळपापड झाला नसता तरच नवल!
संतापलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी लागलीच ठाकरेंच्या शिवसेनेचा हिशेब चुकता करण्याची भाषा सुरू केली
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हर्षवर्धन सपकाळांना थेट दिल्लीतून उत्तर मिळालं
खासदार संजय राऊतांनी काँग्रेसची लाज काढायला सुरूवात केलीय आणि चंद्रपुरातील सत्तानाट्याचं खापर काँग्रेसच्याच डोक्यावर फोडलंय
चंद्रपुरात आपल्या तोंडाशी आलेला घास भाजपनं कसा हिरावून नेला?
यावर काँग्रेसनं कितीही मंथन केलं तरी आता त्याचा काही उपयोग नाही...
मात्र संजय राऊतांनी चंद्रपुरातील काँग्रेसचं राजकीय पोस्टमार्टम सुरू केलंय
All Shows


































