Chandrakant Patil Special Report : मराठा आरक्षणावर दादांची चुप्पी का? सर्वपक्षीय बैठकीला गैरहजेरी
abp majha web team | 12 Sep 2023 11:40 PM (IST)

चंद्रकांत पाटील... उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री... आणि पुण्याचे पालकमंत्री... गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच चर्चेत आहे... आणि तेही त्यांच्या अनुपस्थितीवरून... कधी अजितदादा बैठका घेऊन मोकळे होतात, कधी पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादा शब्दही उच्चारत नाहीत... इतकंच नाही तर, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना, चंद्रकांत दादा कुठेच दिसत नाहीत... आणि तेही चंद्रकांत पाटील मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी असताना... त्यामुळे चर्चांना उधाण आलंय...