आता 'राज्य' सहकार खात्याचंच? केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच सहकार खातं : स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2021 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : सहकार हा विषय राज्यांच्या अखत्यारीत येत असताना केंद्र सरकारने नव्याने सहकार खात्याची स्थापना करुन त्याची धुरा अमित शाहंकडे सोपवलीय. सहकारातून समृद्धी असा नारा देत देशभरातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी या मंत्रालयाच्या मार्फत प्रयत्न केले जातील असा दावा करण्यात आलाय. पण नवं मंत्रालय आणि नव्या नियमांच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतंय का अशी शंकाही घेतली जाऊ लागलीय. तसं झालं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या राज्यातील सत्ता समीकरणांवरही होणार आहे.