हॉलमार्कनंतर आता सराफा व्यापाऱ्यांना अतिविशेष क्रमांकाची सक्ती,सराफा व्यापारी वि.केंद्र सरकार संघर्ष
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2021 05:09 PM (IST)

Gold Rate Today : सलग वाढणाऱ्या सोन्याच्या दराला गेल्या चार दिवसांपासून ब्रेक लागला असून आजही सोन्याची किंमत स्थिर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) च्या व्यवहारानुसार, मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा दर हा 48,380 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 47,380 रुपये इतका आहे. चांदीच्याही दरामध्ये केवळ 50 रुपयांची वाढ झाली असून आता एक किलो चांदीसाठी 67,900 रुपये मोजावे लागणार आहेत.