Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report

Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report
भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी त्याच्या दरबारात हजेरी लावायचे.. त्याचा प्रभाव एवढा होता की काही जण तर चक्क त्याचे पायही धुवायचे... पण आता त्याचा पर्दाफाश झालाय.. तो नुसता भोंदू मांत्रिक नाहीय, तर त्याच्यात वासनांध सैतानाही दडलाय.. नाशिकच्या कॅनडा कॉर्नसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये, कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातनं त्याचं दुकान थाटलं होतं. आपल्याच कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार करताना हा विकृत भोंदूबाबा कॅमेऱ्यात कैद झालाय. पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर या भोंदू मांत्रिकाची कुंडली जगासमोर आलीय.. त्यामुळे वासनांध मांत्रिकाबरोबरच, त्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांचीही अडचण वाढलीय...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांकडून ही पाद्यपूजा करण्यात आली होती
पूजेदरम्यान रुपाली चाकणकर ज्याचे पाय धुताहेत तो आहे अशोक खरात उर्फ कॅप्टन...
आता हा फोटो पाहा...
अशोक खरात पावसात भिजू नये म्हणून रूपाली चाकणकरांनी त्याच्या डोक्यावर छत्री पकडलीय
आता अशोक खरातच्या भक्तांच्या यादीत एकट्या रूपाली चाकणकर नाहीएत..
तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील अशोक खरातचं दर्शन घेतलं होतं
एकनाथ शिंदेंबरोबर भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी देखील अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावली होती