Cabinet Expansion Special Report : विस्तार होल्डवर, जनता वाऱ्यावर! मंत्रिमंडळ नसल्याचा कुणाला फटका?
abp majha web team | 25 Jul 2022 10:32 PM (IST)

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याशपथविधीला पंचविस दिवस झालेत. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे राज्यातील अनेक विकासकामं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अडकलेले पाहायला मिळतात. जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर अंतीम निर्णयासाठी मंत्री नसल्याने मुख्यमंत्री यांच्याकडे नस्तीपाठवायला ही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊन प्रत्येक विभागाला मंत्री कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय.