नाशिकमध्ये 1 जुलैपासून बससेवा, पहिल्या टप्प्यात 50 डिझेल बस धावणार, 27 जूनपासून बसेसचं ट्रायल रन
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा | 14 Jun 2021 10:24 PM (IST)
अनेक अडचणी आव्हानाचा सामना करत नाशिक महानगर पालिकेच्या बस सेवेला मुहूर्त लागलाय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतनाच महानगर पालिकेच्या माध्यमातून परिवहन बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. शहर वाहतूक सेवा एस टी महामंडळाल परवडत नाही ती महापालिकेला कशी परवडणार असा सवाल उपस्थित करत विरोधकानी बससेवेला कडाडून विरोध केला. मात्र विरोध हाणून पाडत सत्ताधारी भाजपने प्रकल्प दामटून नेण्यास सुरवात केली.