Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
आता पुन्हा एकदा मुंबई लोकल आणि त्याच्या सुरक्षेसंदर्भातील बातमी.. शुल्लक कारणांवरुन मुंबई लोकलमध्ये होणारे वाद... त्यातून झालेली हत्या.. हे मुंबईकरांना फार जवळून पाहिलंय. पण एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला... नेमकं काय घडलं? पाहूयात....
लोकल प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात असताना
हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलंय.
हा व्हिडिओ आहे मध्य रेल्वेच्या महिला डब्यातला.
बुरखा घातलेला एक पुरूष अचानक महिलांच्या डब्यात चढला...
त्यानं काही जणींना चुकीचा स्पर्शही केला...
त्यामुळे काही वेळानं महिलांना संशय आल्यानं महिलांनी त्याला घेरलं...
इतक्यात घाटकोपर स्टेशनला गाडी लागत असताना या संशयितानं चालत्या ट्रेनमधून उडी मारली
आणि समोरून येणाऱ्या कर्जत लोकलमध्ये चढून तो पसार झाला...
लोकल ट्रेनचा प्रवास हा दिवसेंदिवस अधिकच असुरक्षित होत चाललाय का असा प्रश्न पडतोय.
कालच भांडणाच्या नादात एकानं लोकल डब्यात दगड भिरकावला. ज्यात एका निष्पाप मुलाचा डोळा निकामी झाला. तर गेल्या महिन्यात मालाड स्थानकावर एका प्राध्यापकाची शुल्लक कारणानं हत्या झाली. असं असताना आता महिलांसाठी राखीव असणाऱ्या डब्यात दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं बुरखा घालून पुरूष चढल्याची धक्कादायक घटना घडली
घ़डलेल्या प्रकाराच्या वेळी डब्यातल्या काही महिलांनी त्याचे व्हिडिओ काढले.
तर काहींनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला...
मात्र गाडी प्लॅटफॉर्मला लागण्याच्या आधीच त्यानं पळ काढला.
या सगळ्या प्रकाराची महिला प्रवाशांनी तात्काळ कंट्रोल रुमला माहिती दिली.
आणि व्हिडिओचे पुरावेही दिले.
य़ानंतर पोलिसांनी मुलुंड, ठाणे अशा स्थानकांवर तपास सुरू केला
मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेलं नाहीय.
सोबतच पोलिसांनी कलम 162 च्या अंतर्गत गुन्हाही दाखल केलाय
All Shows


































