Sanjay Gaikwad Special Report : पुस्तकाबद्दल अज्ञान, गुंडगिरी बेभान,संजय गायकवाडांची जीभ घसरली

आज जागितक पुस्तक दिन...मात्र एका पुस्तकावरून महाराष्ट्रातील शिवराळ आमदारानं बराच गदारोळ घातलाय.... आमदार आहेत शिवसेनेचे... आणि नाव आहे संजय गायकवाड... ३८ वर्षांपासून ज्या पुस्तकाच्या दीडशे आवृत्त्या निघाल्यात... ते, शिवाजी कोण होता? पुस्तक पहिल्यांदाच संजय गायकवाडांच्या हाती पडलं... आपण कट्टर शिवप्रेमी आहोत हे सिद्ध करण्यासाठी संजय गायकवाडांनी पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला.. नुसता आक्षेपच नाही तर प्रकाशकाला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. आता अशा आमदारांचं काय करावं? पक्षप्रमुखांनी बाकी काही नाही, पण शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्याची सक्ती संजय गायकवाडांना केली तरी पुरे.. असंच म्हणण्याची वेळ आलीय..
शिवाजी कोण होता?
कॉमरेड गोविंद पानसरेंनी १९८८ मध्ये लिहिलेलं हे पुस्तक...
ज्यांना सोप्या आणि समर्पक भाषेत शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचंय,
त्यांच्या हातात अनेक जाणकार हेच पुस्तक ठेवतात
म्हणूनच ३८ वर्षांनंतरही, 'शिवाजी कोण होता?', या पुस्तकाच्या कित्येक आवृत्त्या निघाल्यात...
मात्र स्वतःला शिवाजी महाराजांचे कट्टर भक्त म्हणवून घेणारे...
बुलढाण्याचे शिवसेनेचे मारकुटे आणि शिवराळ आमदार संजय गायकवाडांच्या हातात हे पुस्तक पहिल्यांदाच पडलं..
आणि त्यांचं पित्त खवळलं.
पुस्तकाच्या शिर्षकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला?
असा जाब विचारण्यासाठी त्यांनी संघर्षा प्रकाशनाचे प्रशांत आंबी यांना फोन लावला
मात्र जीभ टाळ्याला लावण्याआधी आमदार गायकवाडांनी ना पुस्तकाबद्दल माहिती घेतली...
ना गोविंद पानसरेंची कारकीर्द जाणून घेण्याचे कष्ट घेतले...
फोन संभाषणची ही क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झाली
आणि नववी पास आमदार संजय गायकवाडांच्या पुस्तकाबद्दलच्या अज्ञानाचं सर्वांनाच दर्शन घडलं
मात्र शिव्या देण्यात जणू पीचएडी केलेल्या संजय गायकवाडांची भाषा ऐकल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला कानावर हात ठेवण्याची वेळ आली