Buldhana : बुलढाण्याच्या बोकडासाठी 51 लाखांची बोली, बोकड पाहण्यासाठी करवंड गावामध्ये गर्दी
संजय महाजन, एबीपी माझा
Updated at:
16 Jul 2021 07:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे, कारण या बोकडाची खासियतच तशी आहे. टायगर नावाच्या या बोकडाला गेल्या आठवडाभरापासून पाहण्यास ग्रामस्थच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक जण गर्दी करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील करवंड गावचा उंच पुरा गडी, मोठं कपाळ, मजबूत बांधा जणू काही रोजच जिममध्ये जातो. ताकदीने एवढा मजबूत की दोन तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. असा हा टायगर... या टायगवर लाखोंची बोली लागण्याचं कारणच वेगळं आहे, ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः "अल्लाह" उमटलेलं आहे. त्यामुळे जाणकार असं सांगतात की ज्यांच्याकडे अशी जनावरं आढळतात त्यांना नशीबवान मानलं जातं.