मुलांनी घराबाहेर काढलं,न्यायासाठी आई-वडिलांची वयाच्या नव्वदीत मुलांमुळे कचेरीची वारी,जगण्याचा प्रश्न
संजय महाजन, एबीपी माझा | 02 Aug 2021 10:15 PM (IST)
बुलढाणा : घरातला कर्ता पुरुष म्हणून मोठ्या मुलाच्या नावाने आम्ही हयात असतांनाच त्याच्या वाटेची जमीन दिली. मात्र एवढं सगळं असतांनाही मोठ्या मुलाकडून वारंवार मारहाण व त्रास दिल्या जात असल्याने आम्ही वृध्द आई-वडील हतबल झालो असून असा मुलगा ईश्वराने कोणाच्याच पोटी घालू नये. "असा मुलगा असण्यापेक्षा वांझ राहणे कधीही चांगले.!" असे वक्तव्य अश्रूपूर्ण डोळ्यांनी पत्रकार परिषदेत मुलाच्या त्रासाने पिडीत झालेल्या बुलढाण्यातील देऊळगाव माळी या गावातील आई-वडिलांनी केलंय.