Bollywood Movie Special Repport : ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘विक्रम वेधा’ बॉलिवूडला तारणार?
abp majha web team | 08 Sep 2022 12:01 AM (IST)

‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘विक्रम वेधा’ बॉलिवूडला तारणार? सध्या हाच प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जाऊ लागलाय. आणि याचं कारण आहे गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होणारे बिग बजेट हिंदी चित्रपट. तर दुसरीकडे दक्षिणेचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींच्या उड्या मारू लागलेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर दक्षिणेतील चित्रपटांचं आक्रमण होत असताना मोठं वादळ घोंघावत असताना ब्रह्मास्त्र आणि विक्रम वेधा काहीशी आशा घेऊन समोर येतायत. चांगला कंटेंट असेल तर प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतातच. ब्रह्मास्त्र आणि विक्रम वेधाचा कंटेंट तर चांगला दिसतोय. त्यामुळेच हे दोन्ही चित्रपट बॉलिवूडला तारणार का बघुयात या रिपोर्टमधून