Bogus Seeds : बियाणं घेताना शेतकऱ्यांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलेटिनच्या सुरूवातीलाच बातमी पाहूया, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची... महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाचा शिडकावा पडलाय. त्यामुळे बळीराजाने पेरणीची तयारी सुरू केलीय... त्यासाठी बियाण्यांची आणि खतांची खरेदीही सुरू झालीय... मात्र, घाम गाळून पीक उभं करावं, त्यातून पोटापुरतं धान्य पिकवावं... अशी स्वप्न शेतकरी पाहतोय. मात्र, याच शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल करत, काळ्या आईच्या कुशीत बोगस बियाण्यांचं विष कालवण्याचे प्रकार सुरू झालेयत. आणि इतकंच नाही तर, बोगस ते बोगस आणि तेही चढ्या दराने... असं सगळं करणारं एक रॅकेटच कार्यरत झालंय... त्याचाच छडा लावलाय, एबीपी माझानं... स्टिंग ऑपरेशनमधून या नफेखोरांचं पितळ उघडं पाडलंय... पाहूयात, शेतकरी आणि शेतीच्या जीवावर उठलेल्यांचे काळे धंदे आणि त्याचा एबीपी माझाने केलेला पर्दाफाश...