BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
जाहीर सभा, रोड शो, भेटीगाठी आणि मुलाखती या सगळ्या गोष्टींनी आता वेग घेतलाय. आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी या माध्यमांचा सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार वापर केला जातोय. ठाकरे बंधूंची एकत्रितपणे प्रसिद्ध झालेली मुलाखत हा याच प्रचारातला एक महत्त्वाचा भाग. ठाकरे बंधूंच्या सभांची अजूनही महाराष्ट्राला प्रतिक्षा असली, तरी या सभांमध्ये कुठले मुद्दे असणार, याची झलक संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीतून मिळाली. बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांपासून ते राज्याला पडलेल्या ड्रग्जच्या विळख्यापर्यंत अनेक बाबींवर बोट ठेवत ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. बघूया, या मुलाखतीचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट.
ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी अपेक्षेप्रमाणंच सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं.
राज्यात चर्चेत असणारा बिनविरोध उमेदवार निवडीचा मुद्दा ठाकरे बंधूंनी जेन-झीच्या संतापाशी जोडण्याचा प्रयत्न केला.