BJP vs Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेवरून काँग्रेस - भाजप आक्रमक Special Report
abp majha web team | 12 Sep 2022 11:09 PM (IST)

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी कन्याकुमारीत आहे. त्यांनी शनिवारी वादग्रस्त कॅथोलिक पादरी जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकारण तापत असून भाजपने या भेटीवर टीका केली आहे. या भेटीची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पादरी पोन्नैया राहुल गांधी यांना सांगत आहेत की, येशु ख्रिस्त हेच एकमेव भगवान आहेत. इतर कोणतेही देवता किंवा देवी नाहीत. त्यांच्या या वादग्रस्त विधानावर टीकेची झोड उठवली जात आहे.