BJP Shiv Sena Loksabha Special Report : लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, नााराजी वाढली?
abp majha web team
Updated at:
26 May 2023 09:07 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Shiv Sena Loksabha Special Report : लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, नााराजी वाढली?
लोकसभेच्या जागांचा तिढा ठाकरे आणि शिंदेंसमोर आहे ..आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन मविआ पाठोपाठ शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय..कारण एकनाथ शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी ४८ पैकी २२ जागांवर दावा सांगण्यात आलाय..बुधवारी शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली..यावेळी 22 जागांवर तयारी करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यमान खासदार आणि अन्य नेत्यांना दिेले आहेत..तर २०१९ साली ज्या फॉर्मुल्यावर निवडणुका लढवल्या आता त्याच फॉर्म्युल्यावर निवडणुका लढवण्यास तयारी करा असे आदेश शिंदेंनी दिल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनीही सांगितलं.