Pune : भाजप आमदाराकडून महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ? तीन वर्षांपूर्वीची क्लिप व्हायरल ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2021 07:57 PM (IST)

पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील महिला कार्यकारी अभियंत्यास शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या ऑडिओ क्लीपमधे आमदार सुनील कांबळे पुणे महापालिकेतील कार्यकारी अभियंता सुश्मीता शिर्के यांना अपशब्द वापरताना ऐकायला मिळतायत. एका कंत्राटदाराचे कामाचे बील लवकर मंजूर होत नसल्याने सुनील कांबळे यांनी महापालिकेतील अधिकार्यांना फोन केल्यावर हा प्रकार घडलाय.