Shinde Group Vs BJP Osmanabad : उस्नानाबादेत शिंदे गटात वादाची ठिणगी? तानाजी सावंतांविरोधात तक्रार
Pravin Wakchaure | 15 Feb 2023 10:56 PM (IST)
Shinde Group Vs BJP Osmanabad : उस्नानाबादेत शिंदे गटात वादाची ठिणगी? तानाजी सावंतांविरोधात तक्रार
उस्मानाबादचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडलीय... आणि याला निमित्त ठरलंय ते जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी वाटपाचं... राणा जगजीतसिंह पाटील यांनी थेट नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे सावंतांविरोधात लेखी तक्रार केलीय... 2022-23 च्या निधी वाटपाच्या प्रस्तावित कामात इतर मतदारसंघाच्या तुलनेत भुम परंडा मतदारसंघाला झुकते माप दिल्याचा आमदार पाटील यांचा आरोप आहे.... भूम परंडा हा सावंत यांचा मतदारसंघ आहे... विशेष म्हणजे तानाजी सावंत शिंदे गटाचे आमदार आहेत... त्यामुळे इथं शिदें गट विरुद्ध भाजप आमदार असा संघर्ष पाहायला मिळतोय..