Bhiwandi Theft : स्वत:चं लग्न धुमधडाक्यात करण्यासाठी चोरी, लग्नाच्या आधी पोलिसांची बेडी
अनिल वर्मा, एबीपी माझा | 11 Dec 2021 12:39 AM (IST)

भिवंडीत लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच एकाला पोलिसांनी अटक केली आहे.. लग्नसोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी आणि बायकोला महागड्यात गाडीत फिरवण्यासाठी या बहाद्दरानं १० महागड्या कार, सहा दुचाकी तसंच मंगळसूत्र चोरलं होतं. या गुन्ह्यात आरोपी शिवसिंगला लग्नाच्या अगोदर ताब्यात घेतलंय.