Bhandara Ramabai Chavan SSC Result : नाथगोजी समाजातली पहिली मॅट्रिक पास मुलगी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरात तर, सोडा समाजातही फारसं कुणी शिकलेलं नाही...अशा शिक्षणापासून कोसोदुर असणाऱ्या आणि पोटाच्या उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागणारा आणि त्यासाठी सातत्यानं गावोगावं भटकंती करणाऱ्या नाथजोगी समाजातील पहिली मुलगी दहावी पास झाली. मुलं कसंबसं शिक्षण घेत आहेत. मात्र, मुलीच्या शिक्षणाला या समाजात प्रचंड विरोध असताना रमाबाई चव्हाण ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली असून पहिल्याच प्रयत्नात तिनं दहावीत ६१ टक्के मार्क्स घेत पास झाली. शिकवणी तर दूरचं परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत पुस्तकही नसताना केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि शाळेत शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या भरोषावर दहावीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पास झाली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कोदामेंढी या गावातील रामबाई चव्हाण या मुलीनं मिळविलेल्या यशानं नाथजोगी समाजातील मुलींच्या शिक्षणाचा नवा अध्याय आता सुरू होण्यास मदत होणार आहे. शहरी भागात पालक त्यांच्या पाल्यांसाठी खासगी शिकवणी लावून देतात. असं असताना शिक्षणाचा गंध नसणाऱ्या नाथजोगी समाजातील रमाबाईनं मिळविलेलं यश खरोखरचं सर्वासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते....रमाबाई आणि तिच्या कुटुंबासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....