✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Bhandara Axis Bank Manager Fraud : बँक मॅनेजरनेच लुटली बँक, ठेवीदारांना गंडा Special Report

abp majha web team   |  05 Feb 2025 11:46 PM (IST)

१ लाखाच्या बदल्यात २ लाख रुपये देतो असं तुम्हाला कुणी म्हटलं तर ? काहींच्या मनात संशयाची पाल चुकचुकेल.. पण पैशांची हाव करणारे लगेच हा व्यवहार करायला तयार होतील नाही का?.. भंडाऱ्यातही असंच घडलंय. पाच कोटींच्या बदल्यात सात कोटी देतो अशी बतावणी एका टोळीने बँक मॅनेजरला केली. बँक मॅनेजरलाही हे खरं वाटलं म्हणून त्याने या व्यवहाराला होकार दिला.. पण आता प्रश्न हा आहे की बँक मॅनेजरकडे पाच कोटी आले कुठून? चला तर मग पाहूया या रिपोर्टमधून.. 


५ कोटींच्या बदल्यात ७ कोटी रुपये देण्याचं प्रलोभन देत उत्तराखंड, छत्तीसगड आणि गोंदियाच्या टोळीनं भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरलाचं झाश्यात ओढलं. आणि पैशाच्या आमिषान ॲक्सिस बँकेचे मॅनेजर यांनी त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं बँकेतून पाच कोटी रुपये काढले. मात्र, पुढील अनर्थ होण्याच्यापूर्वीचं भंडारा पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या मुस्क्या आवळत बँकेतून काढलेली पाच कोटींची रक्कम ताब्यात घेतली. काल या कारवाईत भंडारा पोलिसांनी ९ आरोपींना ताब्यात घेतलं होतं. आज पुन्हा एका आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.


तुमसर येथील ॲक्सिस बँकेत गौरीशंकर बावनकुळे हे बँक मॅनेजर असून मागील सात महिन्यापासून या स्कॅम करणाऱ्या टोळीनं त्यांना दुप्पट रकमेचा आमिष दिलं. तत्पूर्वी या टोळीनं तुमसरच्या एका धनाड्य व्यावसायिकाला अशा प्रकारचं आमिष देऊन फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला या टोळीवर संशय आल्यानं तो यातून सुटला अशी माहिती आता समोर येत आहे. ॲक्सिस बँकेची मॅनेजर गौशंकर बावनकुळे यांनी काढलेली ही रक्कम तुमसर च्या इंदिरानगर येथील राजकुमार ड्रायक्लीनर्स इथे ठेवली होती. या संपूर्ण प्रकरणात भंडारा पोलिसांनी काल नऊ जणांना ताब्यात घेतलं जात ॲक्सिस बँकेचा मॅनेजर कविशंकर बावनकुळे आणि बँक कर्मचारी विशाल ठाकरे याच्यासह टोळीच्या सात जणांना ताब्यात घेतलं होतं. आज सकाळी आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Bhandara Axis Bank Manager Fraud : बँक मॅनेजरनेच लुटली बँक, ठेवीदारांना गंडा Special Report

TRENDING VIDEOS

Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?4 Hour ago

Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान4 Hour ago

MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?5 Hour ago

Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.