भंडाऱ्यात विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट, आसलपाणी तलाव बनले नंदनवन,डोळ्याचे पारणे फेडणारे विहंगम दृश्य
हरीश मोटघरे, एबीपी माझा, गोंदिया
Updated at:
01 Jun 2021 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्याला सुरुवात झाली की जशी गुलाबी थंडीची चाहूल लागते तसे या थंडी बरोबरच अनेक विदेशी पक्षी आपल्या भागात यायला सुरवात करतात.आपल्या परिसरातील शेतात, झाडांवर, माळरानावर व पाणथळ जागी या पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात होते. हे विदेशी पक्षी मार्च महिन्यामध्ये निघून जातात. मात्र, मे महिना लोटूनही ही विदेशी स्थलांतरित पक्षी अद्यापही जैव विविधतेने नटलेल्या तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलावात मुक्तविहार करताना आढळून येत आहे. हा तलाव या स्थलांतरित पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच बनला आहे.