BEST Strike Special Report : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
abp majha web team | 07 Aug 2023 09:11 PM (IST)

BEST Strike Special Report : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
नोकरदार, महिला, शाळकरी मुलं आणि रुग्णांचेही हाल. बस स्टॉपवर गर्दी. आणि नजरा बसकडे खिळलेल्या. मुंबईकरांची ही परवड सुरूय त्याला आज सहा दिवस झाले. कारणय बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप... तब्बल ९ हजार कर्मचाऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसलंय. मात्र त्यामुळे मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल सुरूयत. एका बाजूला बेस्ट प्रशासन ठाम आहे तर, कर्मचारीही मागे हटायला तयार नाहीय. त्यामुळे सरकार हस्तक्षेप कधी करणार आणि बेस्टचा संप मिटून, मुंबईकरांना दिलासा कधी मिळणार? हा खरा प्रश्नय.