Beed Cirme : चोरीच्या संशयातून बेदम मारहाण; बीडमध्ये पारधी वस्तीवर हल्ला Special Report
गोविंद शेळके, एबीपी माझा | 27 Sep 2021 07:56 PM (IST)
बीड अहमदनगर रोडवरचे अवघे पंधराशे लोकवस्ती असलेले पारनेर गाव. काल गावांमध्ये घडलेल्या घटनेनंतर गावात स्मशान शांतता पाहायला मिळतेय.. मागच्या दोन पिढ्या पासून पारधी समाजाचे एक घर पारनेर गावामध्ये वास्तव्यास आहे..मात्र मागच्या आठवड्यात एक घटना घडली..आणि गावातील सामाजिक सलोखा उध्वस्त झाला. चोरीच्या आरोपातून पारनेर मधल्या पारधी वस्तीवर गावकऱ्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये दोन वर्षांच्या मुलासह त्याच्या आजोबा चा मृत्यू झालाय..काय ही घटना पाहूया माझा चा स्पेशल रिपोर्ट