BE Positive : जिल्हा परिषद शाळा झाली 'हायटेक', कोल्हापुरात रुजली 'व्हर्च्युअल क्लासरुम'ची संकल्पना
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2021 09:49 PM (IST)

कोरोना संकट काळात अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत पण ऑनलाईन शिक्षणामध्ये ग्रामिण भागांत मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहेत आणि यावर पर्याय म्हणून व्हर्च्युअल क्लास ही संकल्पना पुढे आली आहे. कोल्हापूर आणि अहमदनगर मध्ये अशा पद्धतीचे शिक्षण सध्या दिले जात आहे. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.