Baramati : भाजप आमदाराकडून अजितदादांचं कौतुक, दत्तात्रय भरणेंची जयकुमार गोरेंना थेट पक्षाची ऑफर!
abp majha web team | 02 Jan 2022 11:24 PM (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कामाची शैली, धडपड आणि रोखठोक मत यामुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य माणूस किंवा कार्यकर्ताच नाही तर नेतेमंडळीही आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना डायरेक्ट ऑफरच देऊन टाकलीय.