Bageshwar Baba Special Report : बागेश्वर बाबा, तोंडावर नाही ताबा, साईबाबा देव नसल्याचं वक्तव्य
abp majha web team | 02 Apr 2023 11:45 PM (IST)
लाखो-करोडो भाविक, राजकीय नेते, सेलेब्रिटींचे श्रद्धास्थान म्हणजेच साईबाबा यांच्यावर एक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलंय... आणि साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे दुसरे तिसरे कुणी नसून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रीच आहेत..नेहमी वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आता पुन्हा एकदा बरळलेत..जबलपूरमध्ये बागेश्वर बाबाने थेट लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य केलंय..ज्यामुळे साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय..