✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Badlapur Crime Special Report बदलापुरात मातृत्वाचा 'बाजार';गर्भाशयातील स्त्री बीज विक्रीचं रॅकेट उघड

एबीपी माझा वेब टीम  |  21 Feb 2026 10:28 PM (IST)
ABP News

एका बाजूला मातृत्वाची आस लागलेल्या जोडप्यांच्या भावना आणि दुसऱ्या बाजूला गरिबीच्या विळख्यात अडकलेल्या गरजू महिला... याच नाजूक धाग्यांचा वापर करत काही नराधमांनी चक्क स्त्री बीजांचा बाजार मांडला. हे घडलंय मुंबईला लागून असलेल्या बदलापुरात... डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केवळ पैशांच्या हव्यासापोटी महिलांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळणाऱ्या या रॅकेटने समाजातील क्रूर वास्तव समोर आणले असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला.... 
महाराष्ट्रात सुरू आहे मातृत्वाचा सौदा स्त्री बीज विक्रीचा बेकायदेशीर धंदा, मुंबईलगतच्या बदलापूरमध्ये रॅकेटचा पर्दाफाश, मातृत्व...  निसर्गानं स्त्रीला दिलेलं सर्वात मोठं वरदान..मात्र याच मातृत्वाला पैशाच्या तराजूत तोलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय..  बदलापूर मुंबईला लागून वसलेल्या याच शहरामध्ये, स्त्री बीज विक्रीचं रॅकेट चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आलीय..
आता स्त्री बीज विक्रीचं रॅकेट नेमकं कसं चालवलं जायचं ते समजून घेऊयात पैशांचं आमिष दाखवून गरजू महिलांना स्त्री बीज वाढीसाठी तयार केलं जायचं  सोनोग्राफी केल्यानंतर डोनर महिलांना स्त्री बीज वाढवणारे जवळपास १५ इंजेक्शन्स दिले जायचे  स्त्री बीजांची वाढ झाल्यानंतर वैद्यकीय प्रक्रियेद्वारे ते काढून घेतले जायचे  या कामासाठी डोनर महिलेला १० ते १५ हजार रूपये मिळायचे  तर डोनर महिला शोधणाऱ्या मध्यस्थ महिलेला ३ ते ४ हजार रूपये मिळायचे, आरोपी सुलक्षणा गाडेकरच्या पतीनं कुणाला किती पैसे मिळायचे याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला दिलीय.. स्त्री बीज विक्री रॅकेटची व्याप्ती फक्त बदलापूरपुरती मर्यादीत नाहीय..  तर लगतच्या अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील महिलांना देखील या जाळ्यात ओढण्यात आलंय  बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या तीन शहरातील जवळपास ३०० महिलांचा डोनर म्हणून वापर झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली..  आणि या महिलांकरवी वाढवण्यात आलेले स्त्री बीज गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि  केरळ या राज्यांमध्ये विकले जातात,  
दरम्यान स्त्री बीज दान करण्याबाबत कायदा काय सांगतो आणि नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांना गाठलं 
तसंच बदलापूरप्रमाणे महाराष्ट्रात इतर ठिकाणीही असं रॅकेट चालवलं जात असल्याची शक्यचा नाकारता येत नाही  त्यामुळे स्त्री बीज विक्रीच्या रॅकेटचे खरे सूत्रधार शोधून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचं आव्हान तपासयंत्रणांसमोर असणार आहे  सुरेश काटे एबीपी माझा बदलापूर


  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Badlapur Crime Special Report बदलापुरात मातृत्वाचा 'बाजार';गर्भाशयातील स्त्री बीज विक्रीचं रॅकेट उघड

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.